Gratitude Index

Gratitude Index

Gratitude Index by Dr L C Ujede

I was reading a magazine and one sentence made me contemplative. It was an article on positive attitude in life.

The sentence was “Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!”.

I liked the idea of “Gratitude Index.”

In Stock Market, there are Stock Index and Trading Index, and their status is based on their rise and fall.

I thought this gratitude index which counts the feelings of gratitude decides our psychology.

Did I start thinking about how to count the gratitude in my life?
How to decide?
How to bring it into our daily life?

I started thinking deeply about the matter and my mind was filled with many ideas.

1. Gratitude for my natural wealth:
Always remain grateful for a healthy body, strong organs, and thoughtful sensitive mind.
I reflected that we take into consideration our strong body and efficient organs but the efficiency of eyes can be realized when we think of blind people and the value of strong hands and feet can be understood when we compare ourselves with the disabled.
We shall be grateful for our sensitive minds when we think of lunatic patients. Once we realize this point, we shall be grateful for our healthy, and strong bodies.

2. Gratitude for my relatives:
We should have a sense of gratitude for getting a wider family range like mother, father, brother, sister, uncle, aunty.
Unfortunately many times we forget the importance of these relations as we get them in gift automatically when we are born.
We sulk on very trivial matters.
But we can realize the importance of these relations when we look at the growing number of orphans in an orphanage.
We realize how fortunate having our own parents to bow down when we see avid pain in the eyes of those orphans for love and affection.
Siblings are necessary for fighting, playing, and growing together whereas uncle and aunty should be there for fondling.
These relations are undoubtedly important and we should always be grateful to them.

3. Gratitude for my resources:
It denotes home to live, desirable amenities in it, bed and blanket to sleep, good clothes to wear, books and copies to study, a good school to learn, good and tasty food, and many more.
Shouldn’t be I grateful for my earnings to fulfill my necessities?

I get angry for cold tea but I realize the struggle and drippiness of life when I visit the tent houses and huts of foresters.
I got all these things so easily, then shouldn’t I be grateful for them?

4. Grateful for other people who graced my life:
Those who taught me and guided me sincerely, the neighbors, our family doctor, driver, maid, cleaner, watchman of the building, and many more.
Isn’t it necessary to express gratitude towards them?

I was pondering over and the list was extending.
I realized that every day l should determine the ‘Gratitude index’ of everything whether it is person, thing, or situation who contribute in making my life easier and happier.
I have also decided to remain alert always about this ‘Gratitude Index’ and even to hike it with every passing day.
To get this result, I have started to say ‘Thank you to every person who comes in contact with me.
Right from the milk boy and cleaner lady, I have practiced saying ‘Thank you.’ When I go somewhere by rikshaw, after getting down, l deliberately say ‘thank you for patting to the rikshaw driver.
As a matter of fun, before going to bed, I calculate the ‘Gratitude index’ of the day by counting the number of people to whom I said ‘thank you.
Like any other Sensex, this number also changes, but l try hard so that the graph of ‘Gratitude Index’ of the month should rise.

After this endeavor, I experienced a major advantage.
All those whom I thanked might have felt good, but in my perception, l feel profound anonymous satisfaction.
I never bloat, remain in touch with reality, can preserve my relations with others and yes, my ‘thanks’ reach to the innate almighty resides in their heart.

Hence from twenty-four hours of the day, l should give twenty-four minutes to nature just to say ‘thank you which has blessed me with this beautiful life, air to breathe, and food to eat.

“Preservation and conservation of nature” is the real gratitude towards it.

 

कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!

मला ‘कृतज्ञतेचा निर्देशांक’ ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञता भावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा;

१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :
म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, याबद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल.

२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे :
आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही.

३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे :
म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का?
चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय?
थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला?

४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :

मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का

विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून “धन्यवाद” देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा “थँक यू” असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून “थँक यू” म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात “थँक यू” म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक
दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो.

या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं
पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू आपोआपच पोहोचतं …

म्हणूनच ज्याने मला हे जीवन दिले,मला जगण्यासाठी श्वास दिला,पोटासाठी अन्न दिले परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी मी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत.