Ramraksha Shlok 8A
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील आठव्या श्लोकाच्या पहिल्या भागाचा अभ्यास करूया.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.
आठवा श्लोक असा आहे.
आता आपण आठव्या श्लोकाच्या पहिल्या भागाच्या अभ्यासाला आज सुरुवात करूया.
“सुग्रीवेश:” सुग्रीवेश: = सुग्रीव + ईशः, ईश = देव (ईश्वर)
सुग्रीवस्य ईशः = सुग्रीवेशः
सुग्रीवेश = श्री सुग्रीवांचे देव. सुग्रीवांना जे देवाप्रमाणे आहेत / सुग्रीव ज्यांना ईश्वर मानतात, असे ते (प्रभू श्रीरामचंद्र).
“कटी” म्हणजे कंबरेचा भाग (कंबर)
“पातु” म्हणजे रक्षण करोत.
श्री सुग्रीवांचे स्वामी (ईश) आहेत अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या कमरेचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.
“पातु” म्हणजे रक्षण करोत.
“सक्थिनी” म्हणजे दोन्ही जांघा / शरीरातील सर्वात मोठे असे मांडीच्या वरील हाड. (Hip) नितंब. कुल्ला.
हनुमतः प्रभुः = हनुमत्प्रभुः
“हनुमत्प्रभुः” = हनुमंताचा प्रभू.
श्री हनुमंतांचे विस्मरण नाहीसे होऊन त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होणे गरजेचे होते. समुद्र ओलांडून आपण जाऊ शकतो ही जाणीव श्री हनुमंतांना प्रभू श्री रामचंद्रांच्या सान्निध्यात आल्यावरच झाली.
जे श्री हनुमंतांचे प्रभू आहेत अशा श्रीरामचंद्रांनी माझ्या माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचाच्या आठव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाचा अभ्यास आपण उद्या करणार आहोत