Ramraksha Shlok 7B

Ramraksha Shlok 7B

Ramraksha Shlok 7B

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील सातव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाचा अभ्यास करूया.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.

वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.

आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.

आज आपण सातव्या श्लोकाचा अभ्यास पूर्ण करूया.

सातवा श्लोक असा आहे.

या श्लोकातील दुसऱ्या भागाचे महत्व आपण जाणून घेऊया.

“मध्यं” म्हणजे शरीराच्या मध्यभागाचे,

“पातु” म्हणजे रक्षण करोत.

“खरध्वंसी” = खर + ध्वंसी.  खर हे राक्षसाचे नाव आहे. ध्वंस म्हणजे नष्ट करणे.  

खरध्वंसी म्हणजे ज्यांनी खर राक्षसाला नष्ट केलं (वध केला) आहे, असे ते (प्रभू श्रीरामचंद्र)

शरीराचा मध्यभाग म्हणजे उदर किंवा जठराग्नी.  शरीराच्या मध्यभागाचे कार्य समान वायूवर अवलंबून असते.  खर नावाच्या राक्षसाचा वध ज्यांनी  केला आहे अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.

“नाभिं” म्हणजे बेंबीचे,

“पातु” म्हणजे रक्षण करोत.

“जाम्बवदाश्रय:” = जाम्बवतः + आश्रयः 

“आश्रय” = आसरा घेण्याचे स्थान.

लंकेला जाताना प्रभू श्रीरामचंद्राच्या बरोबर श्री हनुमान, श्री सुग्रीव आणि श्री जांबुवंत होते.

जाम्बुवन्तांनी ज्यांचा आश्रय घेतला अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या बेंबीचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.

 

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचाच्या सातव्या श्लोकाचा अभ्यास आपण आज इथे पूर्ण केला आहे.