Ramraksha Shlok 7A
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचाच्या सातव्या श्लोकाचा अभ्यास आता आपण सुरु करूया.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.
आता आपण सातव्या श्लोकाचा अभ्यास सुरु करूया.
सातवा श्लोक असा आहे.
या श्लोकातील एकेका भागाचे महत्व आपण जाणून घेऊया.
“करौ” म्हणजे दोन्ही हातांचे,
“सीतापतिः” म्हणजे जे देवी सीतेचे पती आहेत, असे ते (प्रभू श्रीरामचंद्र)
“पातु” म्हणजे रक्षण करोत.
कृती करताना हातांचे महत्व मोठे आहे.
ज्या हातांद्वारे कृती घडणार आहे त्या हातांचे रक्षण प्रत्यक्ष स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे म्हणजे कोणतेही अयोग्य कृत्य माझ्या द्वारे घडण्याची शक्यताच संपूर्णपणे नष्ट होणार आहे.
आणि म्हणूनच जे देवी सीतेचे पती आहेत, अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.
“पातु” म्हणजे रक्षण करोत.
“हृदयं” म्हणजे हृदयाचे,
“जामदग्न्यजित” = जामदग्न्य (जमदग्नी ऋषींचे पुत्र परशुराम ऋषी ) + जित (जिंकणारे).
“जामदग्न्यजित” म्हणजे ज्यांनी जमदग्नी ऋषींचे पुत्र परशुराम ऋषी यांच्यावर विजय प्राप्त केला आहे, असे ते (प्रभू श्रीरामचंद्र).
हिंदू परंपरेत सप्तर्षी (सात वैदिक ऋषी) आहेत. त्या पैकी एक श्री जमदग्नी ऋषी आहेत. ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या प्रजापतींपैकी एक असणाऱ्या श्री भृगु ऋषींचे श्री जमदग्नी ऋषी वंशज आहेत. श्री जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका देवींचे श्री परशुराम ऋषी हे सर्वात लहान(पाचवे) पुत्र आहेत. श्री परशुराम ऋषी हे भगवान श्री विष्णूंचा अवतार आहेत.
प्रत्यक्ष भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेल्या श्री परशुराम ऋषींना जिंकण्याचे धाडस ज्यांच्या हृदयात आहे अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या हृदयाचे रक्षण करावे. म्हणजे माझ्यातील कोणत्याही प्रकारची भीती संपूर्णपणे नष्ट होणार आहे.
आणि म्हणूनच श्री परशुराम ऋषींना जिंकणाऱ्या, अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या हृदयाचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचाच्या सातव्या श्लोकाचा अभ्यास आपण उद्या पूर्ण करूया.