Ramraksha Shlok 9B

Ramraksha Shlok 9B

Ramraksha Shlok 9B

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील नऊव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाचा अभ्यास करूया.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.

वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.

आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.

नऊवा श्लोक असा आहे.

आता आपण नऊव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाच्या अभ्यासाला आज सुरुवात करूया.

रावण वधानंतर बिभीषणाला राजलक्ष्मी म्हणजे लंकेचे राज्य देणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करावे. बिभीषणाची पावले जशी योग्य मार्गाकडे वळाली तशीच माझी पावले ही वळो.

शरीर हे एक यंत्र आहे. त्याचा वापर आपल्याला साधन म्हणून करायचा आहे. पुरुषार्थ सार्थ करण्यासाठी सर्वांना आनंद देणारा आनंदकंद असा जो राम आहे त्या प्रभू श्रीरामाने माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करावे.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचाच्या नवव्या श्लोकाच्या दुसऱ्या भागाचा अभ्यास आता येथे पूर्ण झाला.