Ramraksha Sukruti

Ramraksha Sukruti

Ramraksha Sukruti

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

एतां रामबल-उपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । सः चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

यः सुकृती रामबल-उपेताम् एतां रक्षां पठेत्,सः चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

यः पुण्यवान् जनः रामबलयुताम् एतां रामरक्षां पठति, सः दीर्घायुः ,सुखी, पुत्रवान्, विजयी तथा विनयी भवति॥१०

रामबलोपेताम्
रामस्य बलं रामबलम्। 
रामबलेन उपेता रामबलोपेता, ताम्।

चिरायुः
चिरम् आयुः यस्य सः।.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

यः पुण्यवान् जनः रामबलयुताम् एतां रामरक्षां पठति, सः दीर्घायुः ,सुखी, पुत्रवान्, विजयी तथा विनयी भवति॥१०

इथे सुकृती या शब्दाकडे विशेष लक्ष देऊया.

वज्रपंजर नावाचे कवच रामरक्षा स्त्रोत्रात आहे. प्रत्यक्ष प्रभू  श्रीरामचंद्रांचे बळ प्राप्त असलेल्या या रक्षा स्तोत्राचे पठण अपेक्षित आहे (स्वतः म्हणणे अपेक्षित आहे).  मनोरंजन म्हणून  / गाणे म्हणून / संगीत म्हणून / करमणूक म्हणून रामरक्षा ऐकणे अपेक्षित नाहीये. स्वतः  रामरक्षा म्हणायची आहे.

आणि पठण करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष असो, सुकृती हवी. तिची कृत्ये सुकृत्य हवीत.  चांगली कृत्य हवीत. पुण्य जोडणारी कृत्य हवीत. अधिक सोप्पं करायचं असेल तर ती व्यक्ती पुण्यवान हवी असं अपेक्षित आहे. तिची कर्म / कृत्य / कृती सकारात्मक हवी. 

प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांच्या  सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे,   पवित्र पुण्यवान सुकर्म करणारा असा जो सुकृती  मनुष्य (स्त्री असो अथवा पुरुष असो), पठण करेल तो दीर्घायुषी होईल. तो सुखी होईल. तो अपत्यवान (मुलगा किंवा मुलगी) पुत्रवान / पुत्रीवान होईल आणि सर्व कार्यात विजय मिळवणारा म्हणजेच यशस्वी होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एवढे सगळे मिळून सुद्धा तो विनयसंपन्न अर्थात तो नम्र राहील.