Ramraksha Shlok 6B

Ramraksha Shlok 6B

Ramraksha Shlok 6B

वज्रपंजर नावाच्या कवचातील सहाव्या श्लोकाचा अभ्यास आज पूर्ण करूया.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.

वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.

आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील सहाव्या श्लोकाचा अभ्यास आपण काल सुरु केला आहे तो आज पूर्ण करूया.

सहावा श्लोक असा आहे

या श्लोकातील एकेका भागाचे महत्व आपण जाणून घेऊया.

“स्कन्धौ” म्हणजे खांद्यांचे,

“दिव्यायुधः” म्हणजे दिव्य अशी शस्त्रास्त्रे ज्यांच्याजवळ आहेत, असे ते (प्रभू श्रीरामचंद्र)

“पातु” म्हणजे रक्षण करोत.

शिक्षण आपल्याला सुशिक्षित करते.

ज्ञान आपल्याला ज्ञानी करते

व्यायाम आपल्याला बलशाली बनवतो.

पैसा आपल्यायला आर्थिक स्थैर्य देतो.

सुडौल शरीर आपल्याला आकर्षक बनवते.

पद आपल्याला सत्ता देते.

श्रीरामचंद्रांच्या सतत संपर्कात (सोअर्स एनर्जीला कनेक्ट) राहिल्यामुळे हे सर्व आपल्याला सहजतेने मिळणारच आहे. आणि इथेच आपली खरी परीक्षा असणार आहे. असं सर्व काही मिळालेले असूनही सुसंस्कृत, नम्र, प्रेमळ, शांत आणि इतरांप्रती करुणा भाव असणारे असे आपल्याला स्वतःला घडवायचे आहे. सेल्फला अपलिफ्ट करायचे आहे.

आणि म्हणूनच दिव्य अशी शस्त्रास्त्रे ज्यांच्याजवळ आहेत आणि जे त्य‍ांच‍ा अतिशय समर्थ पणे सांभाळ करीत आहेत, अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.

“पातु” म्हणजे रक्षण करोत.

“भुजौ” म्हणजे दोन्ही बाहूंचे,

“ भाग्नेशकार्मुकः” – भग्न + ईश +  कार्मुक

भग्न करणे म्हणजे भंग करणे / तोडणे.

ईश म्हणजे महादेव भगवान श्री शंकर.  

कार्मुक म्हणजे चाप / धनुष्य.  

भग्न + ईश +  कार्मुक = भगवान श्री शंकरांचे धनुष्य ज्यांनी तोडले असे प्रभू श्रीराम.

सीता स्वयंवराच्या वेळी जनक राजाने आपली कन्या जानकी (सीता) च्या योग्यतेचा वर ( पती) तिला मिळावा म्हणून शिवधनुष्य तोडू शकण्याचा पण ठेवला होता. सीता स्वयंवराच्या वेळेला शिवधनुष्यचा प्रभू श्री रामांनी लीलया (सहजतेने) भंग केलेला होता.

कठीण परिस्थितीत आपण सापडलो आहोत असे वाटू शकते. जे साध्य करायचे आहे ते खूप अवघड आहे असे इतर सांगू शकतात. हे करणे कठीण आहे असे संपूर्ण समाजाचे म्हणणे असू शकते. पूर्व इतिहास असा असू शकतो. तरीही जराही न डगमगता, स्वतः वर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे, अतिशय प्रेमाने आणि आनंदाने पेरायचं आहे आणि उगवण्या वरील अविश्वासाचं धनुष्य लीलया (सहजतेने) भंग करायचं आहे.

आणि म्हणूनच अशा या लीलया (सहजतेने)  शिवधनुष्यचा भंग करणाऱ्या प्रभू श्री रामांनी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.

श्री रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील पुढच्या श्लोकाचा अभ्यास आपण उद्या सुरु करूया.

This Awesome Website is designed by WebStyleWorld.

Click here to know more.