Ramraksha Shlok6A

Ramraksha Shlok6A

Ramraksha Shlok6A

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील सहाव्या श्लोकाचा आपण आता अभ्यास करूया.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत. वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.

आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.

रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील सहाव्या श्लोकाचा आपण आता अभ्यास करूया.

सहावा श्लोक असा आहे

या श्लोकातील एकेका भागाचे महत्व आपण जाणून घेऊया.

“जिव्हां” म्हणजे जीभेचे,

“विद्यानिधी” म्हणजे सर्व विद्या धारण केलेला / ज्ञानाचा सागर,

“पातु” म्हणजे रक्षण करो.

जीभ हा आपला महत्वाचा अवयव आहे. आपण काय बोलतो आणि काय खातो यावर नियंत्रणासाठी जिभेचे अनन्य साधारण महत्व आहे.

समृद्धी उपासनेमध्ये जिव्हा आणि कंठ यांचे अत्यंत महत्व आहे.

भाव, विचार, लेखन, क्रिया यांचे जेवढे महत्व आहे तेवढेच वाणीचेही महत्व आहे.

सृजन / निर्माण / manifest करण्यासाठी जीभेवर ताबा (जीभेचे रक्षण) अतिशय महत्वाचे आहे.

प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र जीभेचे रक्षक असताना कोणताही अपशब्द वाणी द्वारे प्रकट होणे पूर्णतः नष्ट होऊन,  सेल्फ अपलिफ्टमेंट ची खात्रीच असणार आहे.

प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र जीभेचे रक्षक असताना सात्विक आणि पौष्टिक आहाराचीच जीभ मागणी करेल आणि केवळ चवीच्या आहारी जाऊन अभक्ष भक्षण करू इच्छिणाऱ्या या इंद्रियावर आपले पूर्ण नियंत्रण, इंद्रियावर आपला पूर्ण विजय प्राप्त होण्याची ही खात्रीच आहे.

आणि म्हणूनच सर्व विद्या धारण करणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या जीभेचे रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.

“पातु” म्हणजे रक्षण करोत.
“कण्ठं” म्हणजे गळ्याचे, (गळा आणि मान),

“भरतवन्दित: ” म्हणजे राजा भरत ज्यांना वंदन करत आहेत,  असे ते (प्रभू श्रीरामचंद्र)

भरत हे स्वतः अयोध्येचे राज्यकर्ते असूनही मी राजा आहे असा कर्ता भाव, त्यांच्या भाव विचार वाणी क्रिया आणि लेखन यात कुठेही जरासाही नव्हता. श्रीरामांचे कार्य माझ्या या शरीरा द्वारे सृष्टी (सोअर्स एनर्जी / प्रभू श्रीरामचंद्र) घडवून घेत आहे याचे ज्ञान आणि अखंड जाणीव राजा भरत यांना होती.

आपणही पेरताना आपल्या द्वारे पेरून घेतले जात आहे हे ज्ञान आणि ही अखंड जाणीव ठेवली व प्रेमानी, विश्वासानी आणि अत्यंत आनंदाने पेरले तर पेरलेलं अनेक पटीने वाढून उगवणार हे निश्चित आहे.

आणि म्हणूनच राजा भरत ज्यांना वंदन करत आहेत, अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या कंठाचे (गळा आणि मान) रक्षण करावे, ही इच्छा ब्रम्हांडात व्यक्त करायची आहे.