Ramraksha Ramayan Kramane
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील प्रत्येक ओळीचा क्रम प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनक्रमाशी कसा जुळतो याचा आज अभ्यास करूया.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचातील प्रत्येक ओळीचा क्रम प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनक्रमाशी तंतोतंत जुळतो.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे, प्रार्थना आहे.
प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनक्रमा प्रमाणे रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर नावाच्या कवचात प्रत्येक ओळीचा क्रम कसा सुंदर रचला आहे याचा आज अभ्यास करूया.
१ राघवः = रघुकुलात जन्मलेला. आपण ज्याची उपासना, ज्याला प्रार्थना करीत आहोत त्याचे कुळ कोणते आहे ? आजच्या भाषेत आपण ज्याला फॉलो करीत आहोत तो कोणत्या खानदानातील आहे ?
२ दशरथात्मजः = दशरथाचा पुत्र. याचे वडील / पीता / बाप / बाबा / अप्पा कोण आहेत? हा कोणाचा पुत्र / मुलगा आहे?
३ कौसल्येयः = कौसल्येचा मुलगा. याची आई / माता / जन्मदात्री / मा / अम्मा कोण आहेत? हा कोणाचा पुत्र / मुलगा आहे?
४ विश्वामित्र-प्रियः = विश्वामित्रांचा लाडका. याचे गुरु / शिक्षक / गाईड कोण आहेत ? हा कोणाचा लाडका शिष्य आहे ?
५ मख-त्राता = यज्ञांचा रक्षणकर्ता. ज्ञान यज्ञ असो किंवा कोणत्याही हेतू पूर्ती साठी केलेला यज्ञ असो. त्यात कोणतेही विघ्न येऊ न देणारा. राखण करणारा. रक्षण कर्ता.
६ सौमित्रि-वत्सलः = लक्ष्मणाचा भ्राता. याचा बंधू / भाऊ / अण्णा / भाई कोण आहेत ? हा कोणावर प्रेम करणारा आहे ? सौमित्र = सुमित्रा राणीचा मुलगा = लक्ष्मण. लक्ष्मणा वर वात्सल्य / स्नेह / प्रेम करणारा.
७ भरत-वन्दितः = भरताने वंदन केलेला.
८ भग्नेशकार्मुकः = शिव-धनुष्य ज्याने मोडले, तो.
९ सीता-पतिः = सीतेचा पति.
१० जामदग्न्य-जित् = परशुरामांवर ज्याने विजय मिळवला, तो. जामद्ग्न्य= जमदग्नी ऋषींचा मुलगा = परशुराम.
११ खर-ध्वंसी = ज्याने खरांचा नाश केला तो. खर नावाचे राक्षस.
१२ जाम्बवत्-आश्रयः = जांबवताचा आश्रयदाता. रामसेनेमध्ये जांबवंतांचा समावेश केला होता.
१३ सुग्रीवेशः = सुग्रीवाचा स्वामी.
१४ हनुमत्-प्रभुः = हनुमंताचा प्रभू.
१५ रक्षः-कुल-विनाश-कृत् = राक्षसांच्या कुळांचा ज्याने विनाश केला, तो.
१६ सेतु-कृत् = ज्याने सेतू बांधविला तो.
१७ दशमुखान्तकः = ज्याने रावणाचा अन्त केला, तो.
१८ विभीषणश्रीदः = ज्याने विभीषणाला कल्याणकारी वैभव दिले, तो .
संस्कृत भाषेचे आणि ही रचना करणारे श्री बुध कौशिक ऋषी यांची येथे प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.
केवळ १८ वाक्यात राम जन्म ते रावणवध आणि बिभीषणाला लंकेचे राज्य सोपविणे असे संपूर्ण रामायण अतिशय क्रमाने रचले आहे.