Ramraksha Ramchandra Prityarthe

Ramraksha Ramchandra Prityarthe

Ramraksha Ramchandra Prityarthe

ॐ श्रीगणेशाय नमः ।

मूलम्
ॐ श्रीगणेशाय नमः ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य।बुधकौशिक ऋषिः।श्रीसीतारामचन्द्रो देवता ।अनुष्ठुप् छ्न्दः। सीता शक्तिः ।श्रीमद्धनुमान् कीलकम् ।श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।

पदच्छेदः
ॐ श्रीगणेशाय नमः ।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य।बुधकौशिकः ऋषिः।श्रीसीतारामचन्द्रः देवता ।अनुष्ठुप् छ्न्दः । सीता शक्तिः ।श्रीमत्-हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

श्री गणेश (गणपती)  देवतेला मी नमस्कार करतो. श्री रामरक्षा स्तोत्र  हे श्री बुधकौशिक ऋषिंनी लिहिलेला मंत्र आहे. या मंत्राच्या सीता आणि रामचंद्र ह्या देवता आहेत.

या मंत्राची रचना अनुष्टुप छंदा मध्ये केलेली आहे. या मंत्राची शक्ती देवी सीता आहेत. या मंत्राचा बीज मंत्र श्री हनुमान आहेत. अशा या मंत्र जपाचा विनियोग (वापर)  मी प्रभू रामचंद्रांच्या उपासनेसाठी करत आहे.

या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचे रचयिता (रचणारे) ऋषि श्री  बुधकौशिक असून या रचनेचे छंद (वृत्त) अनुष्टुभ् आहे.  या रचनेचे देवी सीता आणि प्रभू श्रीरामचंद्र या देवता आहेत, या रचनेची सीता शक्ती आहे, या रचनेचे हनुमान आधारस्तंभ आहेत. श्रीरामचंद्राच्या प्रेम पूर्वक जपासाठी विनियोग (वापर) म्हणून हा स्तोत्ररूपी मंत्र निर्माण केला आहे.