Ramraksha Dakshine Vame Purto

Ramraksha Dakshine Vame Purto

Ramraksha Dakshine Vame Purto

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

मूलम्
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

पदच्छेदः
दक्षिणे लक्ष्मणः यस्य वामे तु जनक-आत्मजा । पुरतः मारुतिः यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥

अन्वयः
यस्य दक्षिणे लक्ष्मणः (अस्ति), वामे तु जनक-आत्मजा (अस्ति), यस्य पुरतः मारुतिः (अस्ति), तं रघुनन्दनम् (अहं) वन्दे ॥३१॥

सरलार्थः यस्य दक्षिणपार्श्वे लक्ष्मणः अस्ति, वामपार्श्वे सीता अस्ति, यस्य पुरतः मारुतिः अस्ति, तं रघुनन्दनम् अहं वन्दे ॥३१

जनकात्मजा
आत्मनः जाता आत्मजा।
जनकस्य आत्मजा जनकात्मजा।

रघुनन्दनम्
रघूणां नन्दनः रघुनन्दनः।

ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. डाव्या बाजूला जनक कन्या म्हणजे जनक राजाची कन्या सीतादेवी आहे. आपण कोणत्याही रामाच्या मंदिरात गेलो.तरी आपल्याला या मूर्ती अशाच दिसतात की रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि डाव्या बाजूला सीतामाई. ह्या सगळ्यांच्या पुढे असलेला जो मारुती असतो तो उभा असतो कारण तो दास आहे. अशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.

ज्यांच्या उजव्या बाजूस श्री लक्ष्मण आहेत तसेच डाव्या बाजूस सीता माउली आहेत  आणि पुढे श्री  मारुती आहेत अशा श्रीरामांना मी वंदन करतो.