Ramraksha Shlok5
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे. आता आपण पाचव्या श्लोकाचा अभ्यास करूया.
रामरक्षा स्तोत्रामधील वज्रपंजर कवचाचा आपण सखोल अभ्यास करत आहोत.
वज्रपंजर या नावाचे हे कवच आहे.
आपले रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून, आपल्या शरीराच्या एकेका अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी कसे करावे, यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेली ही विंनती आहे.
आता आपण पाचव्या श्लोकाचा अभ्यास करूया.
माझ्या डोळ्याचे रक्षण कौसल्येचा पुत्र म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे.
पाहणे आणि दृष्टी असणे यात फरक आहे.
त्यामुळे कौसल्येचा (कौसल्या म्हणजे जी कुशल आहे) आशिर्वाद लाभलेला तिचा पुत्र प्रभू श्रीरामचंद्र माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत.
प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र डोळ्यांचे रक्षक असताना कोणताही पूर्वग्रह / दुषित दृष्टीकोन नष्ट होऊन, जे जे जसे जसे आहे ते ते तसे तसेच बघण्याची दृष्टी प्राप्त होण्याची ही खात्रीच आहे.
मी कोण आहे आणि माझ्या मध्ये काय काय सामर्थ्य आहे याची स्पष्ट जाणीव दृष्टीपथात येणार आहे.
माझ्या दोन्ही कानांचे रक्षण विश्वामित्रांचा प्रिय शिष्य असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे. कारण कसे ऐकावे हे फार महत्वाचे आहे.
श्रवणाचे महत्व सांगताना समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात, “श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ”.
प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र कानाचे रक्षक असताना सांगणारा काय सांगतो आहे तेच श्रवण केले जाईल.
आपण जे ऐकू इच्छितो (पण प्रत्यक्षात सांगणारा जे सांगतच नाहीए) ते आता यापुढे, प्रभू श्रीरामचंद्र कानाचे रक्षक असल्यामुळे ऐकलेच जाणार नाहीए.
आता केवळ सत्य श्रवण सुरु राहिल.
म्हणून माझ्या दोन्ही कानांचे रक्षण विश्वामित्रांचा प्रिय शिष्य असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे.
(”घ्राणं” म्हणजे नाकाचे) (”पातु” म्हणजे रक्षण करोत) (“मखत्राता” म्हणजे यज्ञाचे रक्षण करणारा)
यज्ञाचे रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र माझ्या नाकाचे रक्षण करोत.
यज्ञात अहंकाराची / मी पणाची आहुती द्यायची आहे.
यज्ञात क्रोधाची आहुती द्यायची आहे.
यज्ञात कपटाची आहुती द्यायची आहे.
यज्ञात भीतीची आहुती द्यायची आहे.
यज्ञात काळजीची आहुती द्यायची आहे.
यज्ञात असुरक्षिततेची आहुती द्यायची आहे.
यज्ञात अपराधीपणाच्या भावनेची आहुती द्यायची आहे.
मी त्या मूळ स्त्रोतापासून वेगळा आहे, या विचाराची आहुती द्यायची आहे.
प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र आपल्या या यज्ञाचे रक्षक असताना त्या मूळ स्त्रोतापासून आपण दुरावण्याची / डीसकनेक्ट होण्याची कोणतीही शक्यताच शिल्लक उरत नाही.
(“मुखं” म्हणजे तोंडाचे) (“सौमित्र” माता सुमित्राचा पुत्र – दशरथ राजाची राणी सुमित्रा हिचा मुलगा म्हणजे लक्ष्मण) (“सौमित्रवत्सल” म्हणजे लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या)
माझ्या मुखाचे रक्षण लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे.
माझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर आता रक्षक आहे.
मी आणि मूळ स्त्रोत (सोअर्स एनर्जी) यांच्या तील संपर्क तुटेल असे कोणतेही शब्द आता माझ्या वाणीद्वारे उच्चारलेच जात नाहीत.
मुखाचे म्हणजे वाणीचे / शब्दांचे बोलण्याचे रक्षण एवढाच मर्यादित अर्थ नसून मुख म्हणजे संपूर्ण चेहेरा असाही अर्थ अभिप्रेत आहे.
आपले व्यक्तिमत्व आपल्या चेहेऱ्यावर बरेचसे अवलंबून असते, त्याचे रक्षण सौमित्रवत्सल म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे.
माझ्या चेहऱ्यावर कपट नको. दाखवायचा चेहरा एक आणि त्यामागे वेगळंच कोणीतरी लपलेले असं जीवन नको. त्या मूळ स्त्रोताशी (सोअर्स एनर्जीशी) माझा संपर्क निरंतर असावा म्हणून माझ्या मुखाचे रक्षण प्रभू श्रीरामचंद्रांनी करावे.